Tuesday, December 27, 2016

संस्मरणीय फैमिली गेट टुगेदर

जिंदगी के कुछ पल, लम्हे हमारे रिश्तोंकी गहराईयों को हमेशा के लिए यादगार बना देते है. अगर आपकी फैमिली व्यक्तिओं के संख्यासे बडी है तो आपके रिश्तोंके रंगभी गहरे, खट्टे-मिठ्ठे होते है. रिश्ते निभाएँ नही जाते, रिश्ते अपनी भूमिकाओंसे और अपनेपनसे सिंचते है, बडे होते है, फलाते फुलते है. आज हिरानी फैमिलीसे संबंधी रिश्तोंकी अनकही कहानी आपको शेअर करना जरुरी. क्योंकी हम रिश्तोकी कई कडीओंको जोडते आए है और रिश्तोंको अपनेपन से हमने सिंचाभी है. 

Sunday, December 18, 2016

सायकलिंग की जय हो ...

धुळे - नाशिक - धुळे -  शिरपूर - धुळे स्पर्धा पूर्ण केल्यानंतर
जळगाव शहरात गेल्या सहा महिन्यांत आरोग्यासाठी धावण्याचे कल्चर तयार झाले आहे. जळगाव रनर्स गृपमध्ये आज अखेर १६० ते १७० जणांचा सहभाग आहे. धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये जळगावकर आता सहकुटुंब सहभागी होत आहेत. धावणे किंवा पोहणे हा आरोग्यासाठी शारिरीक उत्तम व्यायाम आहे, त्याचवेळी मी असेही म्हणून शकेन की, धावण्याप्रमाणेच सायकलिंग हा ही सर्वोत्तम व्यायाम आहे. दोन्ही प्रकारच्या व्यायामात शरिरीची आवश्यक ती हालचाल नक्की होते मात्र, सायकलिंगमुळे स्नायुंचे चापल्य आणि लवचिकता निश्चित वाढते. शिवाय, स्टॅमिना म्हणजे ज्याला आपण दम (दीर्घ श्वसन क्रिया) म्हणतो, ती सायकलिंगमुळे अधिक वाढते.  

Saturday, December 10, 2016

बालकांमध्ये वाढतेय धावण्याची आवड ...

जळगाव रनर गृपचे बाल सदस्य
सुदृढ आरोग्यासाठी धावणे गरजेचे आहे, हा विचार रुजवण्यात जळगाव रनर्स गृप यशस्वी झाला आहे. प्रौढांसह युवकही आता धावण्यासाठी एकत्र येवू लागले आहेत. अवघ्या सहा महिन्यांत जळगाव रनर्स गृपची सदस्य संख्या १६० वर पोहचली आहे. शहरात नव्याने रुजलेली संस्कृती म्हणून या गृपकडे पाहता येईल. आरोग्यासाठी धावण्याचा विषय आता अनेकांच्या सराव व जिद्दीचा होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये धावपटुंचा सहभाग वाढतोय. त्याविषयी कधीतरी सविस्तर लिहू. मात्र, आज मला लिहायचे आहे ते लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या धावण्याविषयीच्या आवडीचे. रनर्स गृपचे अनेक सदस्य सोबत लहान मुलांना घेवून येतात. ही मुलेही आता पालकांसाह धावू लागली आहेत. रविवारच्या जळगाव रनचे नियोजित ५ किंवा १० किलोमीटरचे अंतर पूर्ण करु लागली आहेत. अशा मुलांचाही आता गृप होतोय. नवी संस्कृती निर्माण कशी होते आणि ती नव्या पिढीत रुजायला कशी लागते ? याचे हे लाईव्ह उदाहरण आहे.

Wednesday, November 9, 2016

होमिओपॅथीसाठी रुग्ण इतिहास का महत्त्वाचा ?



विविध प्रकारच्या वैद्यकिय चिकित्सांच्या संदर्भात काही ना काही आक्षेप सातत्याने घेतले जातात. काही आक्षेप हे होमिओपॅथी विषयी सुद्धा आहेत. त्यात प्रामुख्याने होमिओपॅथी ही वेळ घेणारी आणि दीर्घकाळ सुरू ठेवावी लागणारी उपचाराची पद्धती आहे, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. याशिवाय, होमिओपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर रुग्णांचा इतिहास जाणून घेताना खूप प्रश्न विचारतात असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे समर्पकपणे देवून रुग्णांच्या व इतर सामान्य लोकांच्या मनांत होमिओपॅथीविषयी जागरुकता व विश्वास निर्माण करणे आवश्यक झाले आहे.

Tuesday, October 25, 2016

सुख, समाधान व समृध्दी देणारा वर्सी महोत्सव


जळगाव शहरातील संत कंवरराम नगर हे रहिवासाचे मूळ असलेल्या व संपूर्ण जगभरात विस्तारलेल्या सिंधी समाजाच्या जळगाव येथील पवित्र तीर्थस्थानी दि. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान तीन संतांचा वर्सी महोत्सव उत्साहात साजरा झाला. यावर्षी यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. यात सर्व जाती धर्माचे भाविक होते. पूज्य अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांच्या समाधीस्थळी देशभर व जगभरातून किमान लाखभर सिंधी बांधव आले. अगदी लहान मोठ्या व्यक्तिने या ४ दिवसांच्या धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला. उत्सवाची हीच बाजू लक्षवेधी आणि त्याचे महात्म्य स्पष्ट करणारी आहे.

Tuesday, October 18, 2016

वर्सी महोत्सव एक तीर्थस्थाम महात्म्य



संपूर्ण जगभरात विस्तारलेल्या आणि ज्यांचे भारतातील रहिवासाचे मूळ जळगाव आहे अशा सिंधी समाजाचे एक पवित्र तीर्थस्थान जळगाव शहरात आहे. जळगाव येथील सिंधी कॉलनीत (संत कंवर नगर) पूज्य अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सव बुधवार (दि. १९) पासून सुरू होत आहे. हा महोत्सव चार दिवसांचा म्हणजे शनिवार (दि. २२) ऑक्टोंबरपर्यंत साजरा होईल. या तीनही पूज्य संत साहब यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी हा वर्सी महोत्सव साजरा होतो. 

Saturday, October 8, 2016

सामान्य रुग्णांचा होमिओपॅथीवर वाढता विश्वास


केंद्र शासनाने सरकारी रुग्ण सेवा लोकाभिमुख करण्यासाठी खास आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून सर्व सामान्य रुग्णांना त्यांच्या विश्वासाची आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष मंत्रालयाची सेवा  विस्तारण्यात आली आहे. जवळपास सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये आयुष सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून प्रचलित वैद्यकिय सेवेसह इतरही चिकित्सा पद्धतींवर विश्वास ठेवून रुग्ण उपचार करुन घेत आहेत.