विविध प्रकारच्या वैद्यकिय चिकित्सांच्या संदर्भात काही ना काही आक्षेप सातत्याने घेतले जातात. काही आक्षेप हे होमिओपॅथी विषयी सुद्धा आहेत. त्यात प्रामुख्याने होमिओपॅथी ही वेळ घेणारी आणि दीर्घकाळ सुरू ठेवावी लागणारी उपचाराची पद्धती आहे, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. याशिवाय, होमिओपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर रुग्णांचा इतिहास जाणून घेताना खूप प्रश्न विचारतात असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे समर्पकपणे देवून रुग्णांच्या व इतर सामान्य लोकांच्या मनांत होमिओपॅथीविषयी जागरुकता व विश्वास निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
Wednesday, November 9, 2016
होमिओपॅथीसाठी रुग्ण इतिहास का महत्त्वाचा ?
विविध प्रकारच्या वैद्यकिय चिकित्सांच्या संदर्भात काही ना काही आक्षेप सातत्याने घेतले जातात. काही आक्षेप हे होमिओपॅथी विषयी सुद्धा आहेत. त्यात प्रामुख्याने होमिओपॅथी ही वेळ घेणारी आणि दीर्घकाळ सुरू ठेवावी लागणारी उपचाराची पद्धती आहे, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. याशिवाय, होमिओपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर रुग्णांचा इतिहास जाणून घेताना खूप प्रश्न विचारतात असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे समर्पकपणे देवून रुग्णांच्या व इतर सामान्य लोकांच्या मनांत होमिओपॅथीविषयी जागरुकता व विश्वास निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
Tuesday, October 25, 2016
सुख, समाधान व समृध्दी देणारा वर्सी महोत्सव
जळगाव शहरातील संत कंवरराम नगर हे रहिवासाचे मूळ असलेल्या व संपूर्ण जगभरात विस्तारलेल्या सिंधी समाजाच्या जळगाव येथील पवित्र तीर्थस्थानी दि. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान तीन संतांचा वर्सी महोत्सव उत्साहात साजरा झाला. यावर्षी यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. यात सर्व जाती धर्माचे भाविक होते. पूज्य अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांच्या समाधीस्थळी देशभर व जगभरातून किमान लाखभर सिंधी बांधव आले. अगदी लहान मोठ्या व्यक्तिने या ४ दिवसांच्या धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला. उत्सवाची हीच बाजू लक्षवेधी आणि त्याचे महात्म्य स्पष्ट करणारी आहे.
Tuesday, October 18, 2016
वर्सी महोत्सव एक तीर्थस्थाम महात्म्य
संपूर्ण जगभरात
विस्तारलेल्या आणि ज्यांचे भारतातील रहिवासाचे मूळ जळगाव आहे अशा सिंधी समाजाचे एक
पवित्र तीर्थस्थान जळगाव शहरात आहे. जळगाव येथील सिंधी कॉलनीत (संत कंवर नगर) पूज्य
अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य
ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सव बुधवार (दि. १९) पासून सुरू
होत आहे. हा महोत्सव चार दिवसांचा म्हणजे शनिवार (दि. २२) ऑक्टोंबरपर्यंत साजरा
होईल. या तीनही पूज्य संत साहब यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी हा वर्सी
महोत्सव साजरा होतो.
Saturday, October 8, 2016
सामान्य रुग्णांचा होमिओपॅथीवर वाढता विश्वास
केंद्र शासनाने सरकारी
रुग्ण सेवा लोकाभिमुख करण्यासाठी खास आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून सर्व सामान्य
रुग्णांना त्यांच्या विश्वासाची आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष मंत्रालयाची सेवा विस्तारण्यात आली आहे. जवळपास सर्वच जिल्हा
रुग्णालयांमध्ये आयुष सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून प्रचलित वैद्यकिय सेवेसह
इतरही चिकित्सा पद्धतींवर विश्वास ठेवून रुग्ण उपचार करुन घेत आहेत.
Monday, September 19, 2016
अर्ध मॅरेथॉनचे स्वप्न अखेर पूर्ण ...
Friday, September 9, 2016
माझ्या जिवनातील गुरु
![]() |
| डॉ. ढोलेसर |
Sunday, September 4, 2016
रनर कल्चर झिंगाट ...!!!
जळगाव शहरात धावणाऱ्यांचे म्हणजे रनर कल्चर आता फोफावते आहे. अगदी नव्या भाषेत म्हणायचे तर रनर कल्चर झिंगाट होते आहे. जेव्हा आम्ही जळगाव रनर्स गृप तयार केला तेव्हा मोजकेच सहकारी होते. आता ही संख्या दिवसागणिक वाढून जवळपास १११ पर्यंत पोहचली आहे. एखाद्या शहराचा सांस्कृतिक तथा समाजिक चेहरा ठरवायचा असेल तर त्यात फिटनेससाठी जागरुक असलेल्यांचीही विचार करावा लागतो. अशा मापदंडात जळगाव रनर्स गृप चे योगदान निश्चित लक्षात घ्यावे लागेल.
Subscribe to:
Posts (Atom)






