जळगाव शहरात धावणाऱ्यांचे म्हणजे रनर कल्चर आता फोफावते आहे. अगदी नव्या भाषेत म्हणायचे तर रनर कल्चर झिंगाट होते आहे. जेव्हा आम्ही जळगाव रनर्स गृप तयार केला तेव्हा मोजकेच सहकारी होते. आता ही संख्या दिवसागणिक वाढून जवळपास १११ पर्यंत पोहचली आहे. एखाद्या शहराचा सांस्कृतिक तथा समाजिक चेहरा ठरवायचा असेल तर त्यात फिटनेससाठी जागरुक असलेल्यांचीही विचार करावा लागतो. अशा मापदंडात जळगाव रनर्स गृप चे योगदान निश्चित लक्षात घ्यावे लागेल.
जळगाव शहरात रनर्स गृप कसा
तयार झाला याची कहाणी रंजक आहे. किरण बच्छाव, मी, निलेश भांडारकर, विक्रांत सराफ, अविनाश काबरा, नरेंद्रसिंग
सोलंकी असे सहा जण विविध ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा विचार करुन
धावायचा सराव सुरू केला. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे संदेश
देण्याघेण्यासाठी जळगाव रनर्स गृप तयार केला. दि. १४ फेब्रुवारी २०१६ ला
व्हेलंटाईन डे ला रनिंग सुरू केले.
त्यानंतर जमेल तसे गटाने किंवा एकट्याने धावणे सुरू केले. यासाठी कधी मोहाडी,
शिरसोली रस्त्याचा तर कधी मेहरुण तलाव परिसराचा वापर केला. आजही त्या परिसरात
आम्ही धावत असतो.
जळगाव शहरात धावण्याविषयी
सकारात्मक वातावरण तयार करावे म्हणून धावण्याचे महत्त्व, धावण्याच्या स्पर्धांची माहिती आम्ही सोशल मीडियातून टाकली.
त्यातून प्रचार प्रसार केला. त्या आवाहनानुसार जवळपास ७०-८० जणांनी प्रतिसाद दिला. ते
सर्वजण जळगाव रनर्स गृपचे सभासद झाले. यात उद्योजक, डॉक्टर्स, वकिल,
नोकरदार, अभियंता, महिला,
विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. यात वय वर्षे १८ पासून तर ६० वर्षांपर्यंतचे सहकारी आहेत.
धावणे आरोग्यासाठी अनेक
प्रकारे उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरातील चरबी नियंत्रणात येवून अनेक आजार
सुधारतात. शरीराचा लवचिकपणा टीकून राहतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मानसिक ताण-तमावावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
जळगाव रनर्स गृप दर
रविवारी विशेष फेरीचे आयोजन करतो. एरव्ही ज्याने त्याने रोज जमेल तसे धावावे.
गेल्या जून पासून आम्ही दर रविवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात
धावण्याचा सराव करतो. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान बहिणाबाई गार्डनजवळ गोळा होतो.
तेथून विद्यापीठात वाहनाने जातो. तेथे सहा किलोमीटर व चार किलोमीटर असे दोन राऊंड
आहेत. तेथे धावण्याचा आम्ही सराव करतो. या भागात धावण्याचे दोन फायदे होतात. एक तर
टेकड्यांचा व वळणाचा परिसर असल्यामुळे चढ, उतार
याची सवय होते. वळणे असल्यामुळे स्नायुंना दोन्ही बाजुने वळण घेण्याचा सराव होतो.
हाच सराव महत्त्वाचा असतो. कारण रोज एकच एक प्रकारात धावल्यामुळे तसा सराव होतो.
पुढे त्यात बदल झाला की अवयव फ्रिज होण्याचे धोकादायक प्रकार घडू शकतात. धावण्यापूर्वी
आम्ही वार्म अप करतो. धावण्याच्या सरावानंतर शरिराला ताण आलेला असतो. तेव्हा काही
तरी हेल्दी खाणे केले जाते. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही किंवा थकल्याचा परिणाम
जाणवत नाही.
व्यक्तिगत पातळीवर मी
स्वतंत्रपणे धावण्याचा सराव करीत असतो. सकाळी साडेपाच ते सहा दरम्यान मी नियमीत
सरावाला जातो. सध्या माझे लक्ष सातारा येथे होणाऱ्या २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन (भारतातील
सर्वांत अवघड पैकी दुसरी असलेली) समजल्या
जाणाऱ्या हिल रन स्पर्धेच्या सरावावर केंद्रीत आहे. यापूर्वी बंगळुरू, ठाणे आणि मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होवून मी तेथील
अंतर पूर्ण केले आहे.
आम्हाला मॅरेथॉनमध्ये
सहभागाची प्रेरणा आमचे मित्र किरण बच्छाव यांच्याकडून मिळाली आहे. ते स्वतः इतर
ठिकाणी सहभागी झाले आहेत. ११ सप्टेंबरला लेह-लदाख परिसरात होणाऱ्या २१ किमी हाफ
मॅरेथॉनसाठी बच्छाव व मिलींद राठी ते रवाना झाले आहेत. ही मॅरेथॉन सुमारे १५ हजार
फूट उंचीवर होत आहे. ही सुद्धा भारतातील अत्यंत अवघड मॅरेथॉन मानली जाते.
जळगाव रनर्स गृपध्ये
महिलांचाही सहभाग आहे. येत्या २१ ऑगस्टला मुंबईत आयडीबीआय बँकेतर्फे हाफ मॅरेथॉन झाली.
त्यात जळगाव रनर्स गृपमधील ७ जण सहभागी झाले. याशिवाय २७ नोव्हेंबरला लोणावळा येथे टायगर हिल रन होणार असून
त्यात सहभागासाठी गृपचे सदस्य जात आहेत. मुंबईत १५ जानेवारी २०१७ ला होणाऱ्या
स्टण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉनसाठी गृपमधील १० जण पात्र ठरले आहेत.
धावण्याच्या सरावमुळे निलेश भांडारकर यांचे
जवळपास ३४ किलो वजन कमी झाले आहे. धावल्यामुळे फ्रेश वाटते असे डॉ. हेमंत केळकर म्हणतात.
आरोग्यासाठी धावायला हवे असे किरण बच्छाव म्हणतात.
जळगाव शहरातील सर्वच
नागरिकांना मी यानिमित्त आव्हान करु इच्छितो की, आरोग्यासाठी, निरोगी
जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी,
मनाची प्रसन्नता कायम ठेवण्यासाठी आपण जरुर
धावा. जळगाव रनर्स गृपच्या विविध उपक्रमात सहभागी व्हा. आम्ही तुम्हाला सर्व
प्रकारचे सहकार्य करायला तयार आहोत.
#running #motivation #fitness #jalgaonrunners #positiveenergy #runjalgaonkars #staywow
#running #motivation #fitness #jalgaonrunners #positiveenergy #runjalgaonkars #staywow
खुप सुंदर उपक्रम
ReplyDeleteTHANK YOU V MUCH SIR
Delete