माणसाचे आरोग्य हे त्याचे निरोगी शरीर आणि स्वस्थ, संतुलित
मानसिक अवस्था यावर पूर्णतः अवलंबून असते. शरीर स्वस्थ ठेवण्याकडे माणसं
लक्ष देतात परंतू, मनाची स्वस्थता, संतुलन आणि शांतता याकडे जाणिवपूर्क
लक्ष दिले जात नाही. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांचे परिणाम हे
मनावर होतात. त्यानुसार आनंद, दुःख, निराशा, हास्य, अपमान, संताप असा भावना
मनांत आणि नंतर अवयवांच्या हालचालींवरून स्पष्ट होतात. आनंद असेल तर तो
हसून, नाचून व्यक्त होतो. दुःख असेल तर डोळ्यांच अश्रू येतात. संताप असेल
तर शरीर थरथरते अथवा अबोल होते. अवमान मनांतल्या मनांत गिळून ठेवला जातो.
अशा भाव-भावनांमुळे मानसिक ताण-तणाव निर्माण होतो. हा ताण-तणाव शरीराच्या
इतर अवयवांवरही प्रभाव टाकतो. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो.
त्यालाच आपण मानसिक अस्वस्थता म्हणतो.
Thursday, July 21, 2016
Saturday, July 9, 2016
हेल्थ ईज वेल्थ !!

भारतीय प्राचिन वैद्यक शास्त्रात मानवी आजारावर निसर्गजन्य औषधांपासून उपचार केले जात. वनस्पतींमध्ये असलेल्या रसायनांचा उपयोग आजार, जखमा, विकार बरा करण्यासाठी होत असे. त्यानंतर प्रगत वैद्यकिय उपचार पद्धतींमध्ये आजार, विकाराला प्रतिबंध करतील अशी रसायने मानवाला पिण्यासाठी किंवा बाह्य उपचारासाठी देणे सुरू झाले. शरीरात गरजेनुसार द्रव्य टोचून घेण्याचे आणि त्यानंतर शल्यचिकित्सेचे तंत्र मानवाला अवगत झाले. त्यामुळे मानवी शरीरातील आजाराच्या जंतू, विषाणुंना रोखण्यासाठी प्रतिजैवकांचा (ऍन्टीबायोटीक्स) वापर सुरू झाला.
Saturday, June 18, 2016
कॅन्सर निवारक बॅनर्जी डॉक्टर पितापूत्र
![]() |
| डॉ. प्रसंता बॅनर्जीसोबत डॉ. रवी हिरानी |
होमिओपॅथीचा उपयोग बहुतांश
रुग्णांवर गुणकारी असतो. अगदी जुनाट आजार बरा करण्याविषयीचे अनेक संदर्भ होमिओपॅथी
उपचार पद्धतीत सांगितले जातात. माझाही या व्यवसायातील असाच सकारात्मक अनुभव आहे.
मला पूर्वीपासून होमिओपॅथीच्या माध्यमातून आव्हानात्मक आजार बरे करण्याचा छंद आहे.
सर्वाधिक धोकादायक आणि अती वेदनादायी आजार म्हणून “कॅन्सर” तथा
“कर्करोग” कडे पाहिले जाते. हा आजार झाला आहे, असे
समजल्यावर अर्धे आयुष्य गमावल्याची भावना रुग्णाची होते. हा आजार आहे सुद्धा तसा.
खुप वेदनादायी आणि माणसाचे जीवन हादरवून टाकणारा.
Sunday, May 29, 2016
आय ऍम मॅरेथॉन बॉय !!!
![]() |
| बंगळुरु मॅरेथॉनचे फिनिशर मेडल |
Wednesday, May 4, 2016
प्रतिक्षेचा काळ महत्त्वाचा
![]() |
| डॉ. श्रीरंग ढोलेसर आणि डॉ. हिराणी |
Tuesday, April 26, 2016
जनसेवेचा घेतला वसा
मित्राहो नमस्कार,
मी सुद्धा आजपासून
आपल्याशी संवाद साधणार आहे. बहुधा आठवड्यातून एकदा नियमित चर्चा करुया. मी
आरोग्यसेवेत गेली तेरा वर्षे काम करीत आहे. त्याला जोडूनच सामाजिक कार्याच्या अनेक
संस्था-संघटनांवरही मी आहे. हा अनुभव लक्षात घेता आरोग्यसेवा आणि सामाजिक
कार्यातील अनुभव, नवे विचार, प्रवाह याविषयी चर्चा करणे, इतरांचे एकून घेणे, नवा
विचार मांडणे असा या संवादाचा प्रवास असेल. म्हणूनच, मी त्याला हेल्थप्लस म्हणतो. माणसाचे
आरोग्य निरोगी, सुदृढ राहावे म्हणून जे जे शक्य आहे ते ते सारे प्लस करण्याचा
प्रयत्न आपण करणार आहोत.
Subscribe to:
Posts (Atom)




