Saturday, June 3, 2017

बैठे काम आरोग्यास घातकच !



कोणतेही काम अथवा कार्य तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज, सुलभ व सोपे होते आहे. कमी श्रम आणि कमी वेळेत जास्त उत्पादन व गुणवत्ता देणारे काम करणे शक्य होते आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने मानवी परिश्रम कमी करीत असताना अनारोग्याची अनेक कारणे वाढविली आहेत. अनारोग्य म्हणजे मानवी अवयव व इंद्रियांच्या कमी वापरातून उद्भवणारे आजार. हे आजार आता क्रॉनिकल डिसीज म्हणून सर्वसामान्य रुग्णातही दिसू लागले आहे.

Tuesday, May 16, 2017

सुदृढतेची चाचणी रक्तदान !

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र, रक्तदानासाठी स्वयंप्रेरणेने राजी होणाऱ्यांची संख्या आजही मोजकीच आहे. रक्तदानाविषयी प्रचार प्रसार वाढला. पण रक्ताची गरज असलेल्या जागाही वाढताहेत. रक्ताची गरज ही गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियांसाठी असतेच मात्र, अपघात - घातपातातील जखमी, रक्तविषयक दोष असलेले रुग्ण (हिमोफिलिया व थॅलेसीमिया) अशा अनेकांना मानवी रक्ताची गरज सतत भासत असते. मानवी रक्त हे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेतून तयार करता येत नाही. परंतु, मानवाचे विविध गटातील रक्त एकमेकांना वापरता येते. हे वास्तव लक्षात घेवूनच मानवाचे रक्त मानवासाठी वापरायचे असेल तर ऐच्छिक रक्तदान हाच पर्याय महत्त्वाचा व उपयुक्त ठरतो.  

Tuesday, April 25, 2017

स्वप्नांचाही आढावा घ्यायला हवा !

भारताचे मिसाईल मॅन तथा माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रसिद्ध विधान आहे. ते म्हणाले होते,  ‘स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत बघतो. स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. कलाम हे शास्त्रज्ञ होते. मात्र त्यांच्या विचारांची बैठक ही अध्यात्माचीही होती. त्यांच्या सारखा माणूस जेव्हा चिंतन करुन बोलायचा त्यावेळी त्यात विज्ञान आणि अध्यात्म याचे सुरेख मिश्रण असे. स्वप्नांविषयी त्यांनी केलेले वक्तव्य हे अशाच प्रकारे दुहेरी अर्थांचे आहे.

Sunday, February 19, 2017

कॅन्सर होण्यामागील मानसिक कारणे

मानवाच्या शरिरातील सर्व प्रकारच्या मानसिक व रायायनिक क्रिया या उत्तमपणे काम करीत असतील तरच त्याचे सर्व अवयव व इंद्रिय परिपूर्णपणे व क्षमतेने काम करतात. मानवी शरिरातील सर्व घटकांचे संतुलन राखणे हा होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीचा महत्त्वपूर्ण पाया आहे. रोगी पूर्णतः बरा करुन त्याच्या शरिरातील सर्वच घटकांची पूनर्स्थापना हा होमिओपॅथीचा प्रयत्न आहे. म्हणूनच कॅन्सर सारखा भयानक आजार नियंत्रणासाठी व त्याच्या त्रास कमी करण्यासाठीचे अनेक प्रयोग होमिओपॅथीत होत आहेत.  

Tuesday, February 7, 2017

दौडो जिंदगी के लिए

जळगाव शहरात नियमित रनिंग कल्चर सुरू करणाऱ्या जळगाव रनर्स गृपचा पहिला वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्त जागतिक किर्तीचा आर्यनमॅन हा किताब १६ वेळा जिंकणारे कौस्तुभ राडकर आणि त्यांचे सहकारी अमोद भाटे यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. या दोघांनी रनिंग, सायकलिंग आणि स्वीमिंग याविषयी खुप सोप्या सोप्या टीप्स दिल्या. जळगाव रनर्स गृपचे घोषवाक्यच आहे, दौडो जिंदगी के लिए ... त्याची प्रचिती या दोघा मान्यवरांच्या व्याख्यानातून पुन्हा आली.  

Tuesday, January 31, 2017

सुदृढ आरोग्यासाठी हे कराच...

आपणच आपली जीवनशैली योग्य प्रकारे निवडली तर आपल्याला डॉक्टकडे कमी वेळा जाण्याची गरज पडते. आरोग्य निरोगी, सुदृढ आणि स्वास्थपूर्ण ठेवणे फारसे अवघड नाही. मात्र, त्यासाठी खानपान व राहणीमानाची शिस्त अंगिकारली पाहिजे. स्वास्थपूर्ण जीवन जगणारी व्यक्ती कोणत्याही आजारापासून लांब राहते. आजार झालच तर ती लवकर त्यातून बाहेर पडते. शिवाय, अशा व्यक्तिंना दीर्घायुष्यही लाभते.  
माणस आपल्या क्षमतांपेक्षा जास्त काम करतात. कधी ते गरजेचे असते तर कधी ते दबावातून, तणावातून करावे लागते. अशा प्रकारे मानवी अती श्रमाची पिळवणूक ही मानसिक त्रासाची असतेच, त्यासोबत शारिरीक त्रासही वाढतो. हा त्रास प्रथमतः किरकोळ आजारांना आणि नंतर गंभीर आजारांना आमंत्रण देतो. 

Wednesday, January 11, 2017

Homeopathy is Safe

Homeopathy is a Science based on laws and principles which are still unchanged since its beginning.

Since from very early days homeopathy proves its efficacy in various diseases where other form of medicines has limitations,especially in Chronic Diseases like Rheumatoid Arthritis,Psoriasis etc

Now a days due to advances in sciences like pathology,imaging techniques (X-ray,Sonography,CT Scan, MRI etc),it is easy to assess the results and effects of homeopathic medicines and this is point which are making uncomfortable to our neighbourhood friends as day by day homeopathic doctors are showing marvellous results.