आपणच आपली जीवनशैली योग्य
प्रकारे निवडली तर आपल्याला डॉक्टकडे कमी वेळा जाण्याची गरज पडते. आरोग्य निरोगी,
सुदृढ आणि स्वास्थपूर्ण ठेवणे फारसे अवघड नाही. मात्र, त्यासाठी खानपान व
राहणीमानाची शिस्त अंगिकारली पाहिजे. स्वास्थपूर्ण जीवन जगणारी व्यक्ती कोणत्याही
आजारापासून लांब राहते. आजार झालच तर ती लवकर त्यातून बाहेर पडते. शिवाय, अशा
व्यक्तिंना दीर्घायुष्यही लाभते.
माणस आपल्या क्षमतांपेक्षा
जास्त काम करतात. कधी ते गरजेचे असते तर कधी ते दबावातून, तणावातून करावे लागते.
अशा प्रकारे मानवी अती श्रमाची पिळवणूक ही मानसिक त्रासाची असतेच, त्यासोबत
शारिरीक त्रासही वाढतो. हा त्रास प्रथमतः किरकोळ आजारांना आणि नंतर गंभीर आजारांना
आमंत्रण देतो.
निरोगी, सुदृढ आणि
स्वास्थपूर्ण आयुष्य कसे जगावे किंवा त्याचा मूलमंत्र काय आहे, यासाठीच आजचा हा
लेखन प्रपंच आहे. निरोगी राहण्यासाठी कसे प्रयत्न करावेत किंवा काय करावे असा
संभ्रम अनेकांना असतो. परंतु निश्चित अशी जीवनशैली स्वीकारून आपण आपले स्वास्थ
उत्तम प्रकारे ठेवू शकतो. जास्तीत जास्त आजारापासून लांब राहू शकतो. आपली जीवनशैली
ही नियमित व शिस्तबद्ध असेल तर तुम्हाला फारसे प्रश्न भेडसावत नाहीत. पण, आपली
जीवनशैली सतत बदलत असेल, त्यात अनिश्चितता असेल तर अनेक प्रकारचे ताण तणाव हे
आपल्या सोबत आजार घेवून येतात. त्यातून मानसिक व शारिरीक थकवा, निराशा, चिंता या
आपल्या आयुष्यात डोकावतात. हा धोका टाळण्यासाठी आरोग्य, आहार विहार तज्ञ नेहमी
म्हणतात, तुमची जीवनशैली अशी स्वीकारा की तुम्ही ती सहजपणे जगू शकाल. तुमच्यातील
क्षमता आणि शक्तीचा एवढाच वापर करा की, त्याच्या अति वापराने किंवा जादा
परिश्रमातून तुम्हाला त्रास होणार नाही. तसे केले तरच तुम्हाला समाधानकारक व आनंददायी
आयुष्य सहजपणे जगता येईल. आपल्याला सुदृढ, निरोगी व स्थास्थपूर्ण जगाचे असेल तर
खालील काही गोष्टी आवर्जून पाळा.
नियमित व्याम करा – याचा
अर्थ असा नाही की आपण एखाद्या जीममध्ये जावून अथवा लाल मातीच्या आखाड्यात जावून
घाम गाळायला हवा. हा व्यायाम म्हणजे, स्नायू, अवयवांची हालचाल आणि त्यांचा वापर
योग्य प्रकारे होण्याशी संबंधित आहे. शरिराला पूर्ण व्यायाम हा काही अंतरापर्यंत
नियमित चालून सुद्धा मिळतो. दिवसभरात किमान २० ते ३० मिनिटे चाला. ही सवय
लावण्यासाठी आपल्या पाळलेल्या कुत्र्याला सोबत घ्या. कधी त्याच्या सोबत चाला किंवा
त्याच्या सोबत धावा. चालण्याचा व्यायाम हळूहळू वाढवता येतो. चालण्याच्या
नियमित सरावातून काही लहके व्यायाम करता येतात. त्यामुळे शरिरातील चापल्य टीकून तर
राहतेच पण मानसिक संतुलनही कायम असते. अशा व्यायामातून रोजचे जेवण सहजपणे
पचण्यातही मदत होते. तुमच्या वजनावर नियंत्रण येवून शरिर सुदृढ राहण्यास मदत होते.
आरोग्यापुरतेच जेवा – सध्या
सर्वजण शरिराच्या गरजेपुरताच जेवण्याची किंवा आहार घेण्याची भाषा करतात. यालाच
डाएट कंट्रोल म्हटले जाते. खाण्यासाठी जगायचे की जगण्यासाठी खायचे असा प्रश्न
नेहमी असतो. आहारावर नियंत्रण ठेवणे म्हणजे गहू, कडधान्य किंवा भाजीपाला युक्त
आहार सोडून देणे असे नाही. शरिराला लागणारी योग्य त्या प्रमाणातील ऊर्जा निर्माण
करु शकेल असा आहार घेणे म्हणजे, आहारावरील नियंत्रण होय. याचा अर्थ असाही नाही की,
तुम्हाला जे खायला आवडते ते संपूर्ण खाणे बंद करा. आपण जे काही खातो त्याद्वारे
आपल्या शरिरात किती ऊर्जा निर्माण होते याचा विचार करा. जास्तीची ऊर्जा निर्माण
होत असेल तर शरिरात मेद वाढतो. त्यातून स्थूलपणा, अवयवांची शिथिलता असे प्रकार
होतात. यातून आजार वाढतात. आहार नियंत्रणाचा विचार करताना त्यात भाजीपाला, फळे,
दूध-दुभते आणि पुरेशी कडधान्ये असतील याची काळजी घ्या. अशा पद्धतीच्या आहारातून
शरिराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. शरिरात कमी प्रमाणात फॅट, कॅलरीज, जास्तीत
जास्त प्रोटीन मिळतात. असा आहार निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
पुरेशी झोप घ्या –
आरोग्याचा संबंध हा रोजच्या झोपेशी सुद्धा आहे. छानशी आणि पुरेशी झोप ही आरोग्य
निरोगी व सुदृढ ठेवते. माणसाला रोज किमान ७ ते ८ तास झोप हवी. तरच त्याच्या
शरिरातील रासायनिक क्रिया नियंत्रणात राहून अवयवांची कार्यक्षमता टीकून राहते.
झोप ही लवकर घेणे आणि लवकर
उठणे आवश्यक असते. झोप ही मानसिक, शारिरीक स्वास्थावर परिणाम करते. रात्री उशीरा
झोपणे किंवा नेहमी झोप लागणे या अवस्था आजाराला आमंत्रण देतात.
कुटुंबाला वेळ द्या – आपली
रोजची कामे सांभाळून आपल्या कुटुंबाला वेळ द्या. आपल्या कुटुंबातील नातेवाईकांशी
हसत खेळत राहा. तसे केल्याने मानसिक ताण तणाव होत नाही, निराशा होत नाही तसेच
निद्रानाशाचा त्रास होत नाही.
अधिकचा ताण हा तुमच्या
हृदयावर परिणाम करतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिने योग्य त्या तज्ञांचा सल्ला
घेवून आपला हलका व्यायाम, आरोग्यवर्धक आहार आणि पुरेशी झोप या विषयीचे नियोजन
करावे. लोकांना सामान्य पद्धतीने या आरोग्य विषयक टीप्स देण्यासाठीच आजचा हा लेख
आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.
No comments:
Post a Comment