मानवाच्या
शरिरातील सर्व प्रकारच्या मानसिक व रायायनिक क्रिया या उत्तमपणे काम करीत असतील
तरच त्याचे सर्व अवयव व इंद्रिय परिपूर्णपणे व क्षमतेने काम करतात. मानवी शरिरातील
सर्व घटकांचे संतुलन राखणे हा होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीचा महत्त्वपूर्ण पाया आहे.
रोगी पूर्णतः बरा करुन त्याच्या शरिरातील सर्वच घटकांची पूनर्स्थापना हा
होमिओपॅथीचा प्रयत्न आहे. म्हणूनच कॅन्सर सारखा भयानक आजार नियंत्रणासाठी व
त्याच्या त्रास कमी करण्यासाठीचे अनेक प्रयोग होमिओपॅथीत होत आहेत.
गॅबोर
माटे (एम. डी. २००३) यांनी सन १९८४ मध्ये हृदयरोगी व कॅन्सर (कर्करोग)
संदर्भातील रुग्णांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष जाहीर केले. या दोन्ही
आजारातून रुग्णांना बरे करण्यासाठी फारशा औषधांची नाही. मात्र, त्यांना
मानसिक ताण तणावातून बाहेर काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या
संशोधनात्मक लेखनातून केले.
अलिकडेही
झालेल्या काही संशोधनात असेही आढळते आहे की, हृदयाशी संबंधित विकार
आणि कॅन्सर हा माणसाला अती संवेदनशिलतेतून निर्माण होणारा ताण आणि शारिरीक तणाव
यातून होण्याची शक्यता बळावते. याच्याशी संबंधित अनेक लक्षण अगोदर दिसतात आणि नंतर
त्याचे रुपांतरण हृदय विकार अथवा कॅन्सरमध्ये होते.
कोणता
आजार कोणाला होईल आणि होणार नाही, हे सांगणारे कोणतेही तंत्र किंवा
विज्ञान सध्या विकसित नाही. मात्र कोणत्या प्रकारची लक्षण जास्त दिसत असतील तर
कॅन्सर अथवा हृदय विकार होण्याची शक्यता बळावते हे सांगणारे तंत्र सध्या अस्तित्वात
आहे. त्याच अनुषंगाने असाही निष्कर्ष मांडलो जातो की, सतत
मानसिक ताण व शारिरीक तणावात असलेल्या व्यक्तिंना कॅन्सर अथवा हृदयरोग (कार्डियाक)
होण्याची शक्यता जास्त असते. यालाच सी टाईप ऑफ पेशंट असे संशोधनाच्या भाषेत म्हटले
जाते.
कॅन्सरचा
आजार असलेल्या रुग्णांचे सतत निरीक्षण केले असता असे दिसते की, त्याच्यातील
क्रोधाची आणि नकारात्मक बाबींची परिसिमा ही इतरांपेक्षा पराकोटीची जास्त असते.
यातील कमी अधिक प्रमाणामुळे त्यांच्यातील चांगली व्यक्ती अथवा त्यांचा चांगुलपणा
कमी अधिक होत असतो.
कॅन्सरच्या
रुग्णांमधील क्रोध किंवा नकारात्मकता वाढी मागील एक प्रमुख कारणे असेही असते की, त्याच्यात
न्युनगंड निर्माण होतो की आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात आपल्याला
दुर्लक्षित केले जाते. आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही. असा प्रकारची भावना
त्याच्यातील नकारात्मक संवेदनशीलता अधिक वाढविते. त्यातील सौन्यचा नष्ट होवून तो
अधिक त्रासदायक वर्तणूक करतो. त्यातून आजाराचे दुखणे बळावते.
अशावेळी
संबंधित रुग्णातील ताण – तणावाच्या जागा प्रथमतः समजून घेणे
आवश्यक असते. या बाबी घरातील लोकांना लक्षात येत नाहीत. त्यासाठी वैद्यकिय तज्ञ
आवश्यक असतात. होमिओपॅथीत अशा प्रकारचा अनुभव असलेली तज्ञ मंडळी दिसणाऱ्या
लक्षणांवरुन योग्य ती औषध योजना सत्त्वर करतात. त्यामुळे संवेदनांवर नियंत्रण आणता
येते आणि हळूहळू जवळच्या लोकांविषयी असलेला नकार कमी करता येतो.
मानवी
शरीरातील जीवशास्त्र बिघडले की त्याचा परिणाम मानवाच्या इंद्रीय व अवयवांशी
संबंधित अनेक प्रकारच्या आजारांवर होतो. जसे अती मानसिक व शारिरीक ताणतणाव हा
त्वचेचा रंग खराब करुन शरिरात मेद वाढवतो. याच प्रकारे झोप अनियमित होते.
ताणतणावामुळे शरिरातील प्रतिकारशक्ती कमी होते. माणसाला कोणत्याही गोष्टीचे दडपण
यायला लागते. शऱिरातील साखरेचे प्रमाण वाढविण्याचे काम ताणतणाव करतात. यातून
बुरशीजन्य घटकाद्वारे होणारे आजार शरिरात बळावतात.
होमिओपॅथी
कशी गुणकारी ...
माणसाच्या
मानसिक व शारिरीक ताण तणावाला कमी करण्याचे काम होमिओपॅथी कशी करते याचाही विचार
करायला हवा. कोणत्याही रुग्णाला उपचार करण्यापूर्वी होमिओपॅथी तज्ज्ञ त्या
रुग्णाची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती जाणून घेत असतो. त्यातून त्याला त्याचा
आजाराची भौतिक कारणे समजतात मात्र मानसिक कारणेही समजतात. यालाच होमिओपॅथीत खुप
महत्त्व आहे. होमिओपॅथी म्हणते की, आजारातील रुग्णावर उपचार करु नका
तर रुग्णातील आजारावर मूळापासून उपचार करा. म्हणूनच माणसांच्या संवेदनशीलतेची
अभ्यासही होमिओपॅथीत बारकाव्याने केला जातो.
माझ्या
आतापर्यंतच्या वैद्यकिय सेवेत आणि कॅन्सरवरील रुग्णांवर केलेल्या अनुभवातून असे
आढळून आले आहे की, कॅन्सरच्या रुग्णवर उपचारासाठी होमिओपॅथी
उत्तम तर आहेच मात्र, रुग्णांच्या ताणतणावाला कमी केले
तर इतर पॅथीचे औषधी गुणकारी ठरण्याचे प्रमाण वाढते. होमिओपॅथी औषधे इतर पॅथीसोबतही
घेता येतात. त्याचे साईड इफेक्ट होत नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क आहे, डॉ. हिरानी क्लिनिक, जळगाव, 9370140575
No comments:
Post a Comment