बदलत्या काळात मानवाला निरोगी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध औषधोपचार पद्धतीसंदर्भात वेगवेगळे संशोधन होत आहे. या संशोधनातील मुख्य मुद्दा हा औषधांचा मानवी शरीरावर चांगली व वाईट परिणाम कसा होतो ? याचा अभ्यास करणे हाही हेतू आहे. ऍलोपॅथी म्हणजे भरपूर रसायनांच्या मिश्रणातून तयार होणारी औषधे, आयुर्वेदीक म्हणजे वनस्पतींच्या गुणधर्मांचा वापर करून तयार होणारी औषधे आणि होमिऔपॅथी म्हणजे निसर्गातील अर्कांचा आहे त्याच पद्धतीत वापर करून तयार होणारी औषधे याचा प्रामुख्याने संपूर्ण जगभरात अभ्यास होत आहे. यात ऍलोपॅथीच्या औषधांचे अनेक साईड इफेक्ट आढळून येत असून त्याचा वापर कमी करण्याविषयी संशोधकांचे एकमत होत आहे. आयुर्वेदाच्या संदर्भातही एक आक्षेप आहे. तो म्हणजे, औषधीजन्य वनस्पतींची उपलब्धता आणि योग्य त्या वनस्पतींचा वापर होय. होमिओपॅथीच्या बाबत मात्र असे फारसे आक्षेप नाहीत. कारण, यातील अर्कांचा वापर आहे त्या स्वरुपात शुद्ध पद्धतीने केला जातो. त्यात इतर रसायनांचा वापर न करता शुगर असलेल्या गोळ्यांचा बेस म्हणून वापर असतो.
कोणत्याही औषधाची कार्यक्षमता सिध्द करण्याची पध्दत होमिओपॅथीमध्ये आहे. अगदी पूर्वापार माणसांवर औषधांचा काय परिणाम होतो हे होमिओपॅथीने अभ्यासले आहे. औषधाची लक्षणे व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ प्रकारात पाहिली जातात. म्हणूनच प्राण्यापेक्षा माणसांवरील प्राभावाला होमिओपॅथी अगोदरपासून महत्व देते.
औषधाचा बरा वाईट गुण समजण्यास वेळ लागतो. शरीरात होत जाणारे बदल आणि मानसिक बदल यासाठी समजून घ्यावे लागतात.
व्यक्तिला निरोगी ठेवण्याचे काम जी शक्ति करते तिला चैतन्य शक्ति म्हणतात. निरोगी व्यक्ती मध्ये ही शक्ति सर्वसाधारण पातळीवर असते. आजारीपणामध्ये ती सर्वसाधारण स्थितीवरुन ढळते. आजारी अवस्थेत औषधांच्या आधारे ती शक्ति परत सर्वसाधारण पातळीवर आणायची असते आणि त्यासाठी औषधांची कमी अधिक तीव्रता वापरावी लागते. म्हणूनच प्रारंभापासून होमिओपॅथीला नो साईड इफेक्ट असलेली उपचार पद्धती मानतात. कारण माणसाचा शारीरिक आजार दूर करण्यासेबत मानसिक स्वास्थ पूर्वत करण्याचे काम होमिओपॅथी करते. होमिओपॅथीत मूळापासून आजार नष्ट करावा अशी संकल्पना आहे. म्हणूनच त्याचे परिणाम हे संथ का असेना मात्र दूरगामी परिणाम देणारे असतात. हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समजून घेतला तर होमिओपॅथी ही उशीरा किंवा खुप वेळाने परिणाम करते हा आक्षेपच गैरलागू ठरतो. होमिओपॅथीची सर्व औषधे ही मुखावाटेच घेतली जातात. त्यांचे स्वरुपही बहुधा एक सारखे असते. कारण त्यांच्या शुगर बेस गोळ्यांमध्ये हव्या त्या औषधांचे मिश्रण केलेले असते. कोणत्याही प्रकारच्या आवेष्टन अगर आवेष्टीत आवरणात होमिओपॅथी औषध नसते. म्हणूनच होमिओपॅथी ही विश्वासार्ह व जगात क्रमांक दोनची औषधोपचार पद्धती
काही जण असे समजतात की, होमिओपॅथी ही गुंतागुंतीच्या व अत्यंत गंभीर आजावर उपचाराची व संथगतीने काम करणारी पद्धती आहे. यात तातडीने रुग्णाव आरामदायी उपचार होवून शकत नाहीत. हा सुद्धा एक अपप्रचार आहे. कारण होमिओपॅथीतही लहान-मोछ्या आजारांवर सत्वर गुणकारी ठरू शकतील अशी औषधे आहेत. अगदी साध्या तापावर लगेच आराम देवू शकणारी औषधे उपलब्ध आहेत.
होमिओपॅथी संदर्भातील उपचार करुन घेताना कधीकधी डॉक्टरांचा अनुभव आणि त्यांच्याकडे येणाऱ्या विविध आजारावरील रुग्णांचे प्रमाण हेही महत्त्वाचे असते. ज्या डॉक्टरांचा जेवढा अनुभव तेवढ्या पद्धतीने त्यांच्या उपचारांची योजना असते. होमिओपॅथी औषधांवरील रुग्णाचा विश्वास जगभरात वाढत असून होमिओपॅथीने जगातील दुसरा क्रमांक टीकवून ठेवला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.
होमिओपॅथीविषयी असे म्हटले जाते की, त्याची सर्व औषधे सारखीच असतात. मात्र हा आक्षेर अत्यंत चुकीचा आहे. कारण होमिओपॅथी औषधांचा बेस एकच प्रकारच्या शुगर बेस गोळ्यांचा असतो. मात्र, त्यात असलेले औषधांचे अर्क वेगवेगळे असतात. जवळपास वेगवेगळ्या तीन हजार वनस्पतींच्या अर्कांची ही औषधे शुद्ध प्रमाणात असतात. त्यात इतर रसायने टाकलेली नसतात. या औषधांचा बेस हा शुगर पावडर स्वरुपात असतो.
होमिओपॅथीत एखाद्या आजारातील शस्त्रक्रिया करता येत नाहीत असाही आक्षेप घेतला जातो. त्यासाठी फिशर, कोंब, गाठ आदी प्रकारांची उदाहरणे दिली जातात. मात्र, हाही आक्षेप चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. कारण, होमिओपॅथीत कोणताही आजार मुळापासून नष्ट करणे हे सूत्र आहे. शस्त्रक्रिया केल्यामुळे आजार पूर्ण नष्ट होतोच असे नाही. उलट होमिओपॅथीत तो मुळासकट गायब होतो.
होमिओपॅथीची सर्वांत एक चांगली बाजून अशी की ही औषधे इतर कोणत्याही पॅथी सोबत घेता येतात. अलोपॅथी किंवा आयुर्वेदीक अशा कोणत्याही पॅथी सोबत होमिओपॅथी घेता येतात. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

No comments:
Post a Comment