![]() |
डॉ. प्रसंता बॅनर्जीसोबत डॉ. रवी हिरानी |
होमिओपॅथीचा उपयोग बहुतांश
रुग्णांवर गुणकारी असतो. अगदी जुनाट आजार बरा करण्याविषयीचे अनेक संदर्भ होमिओपॅथी
उपचार पद्धतीत सांगितले जातात. माझाही या व्यवसायातील असाच सकारात्मक अनुभव आहे.
मला पूर्वीपासून होमिओपॅथीच्या माध्यमातून आव्हानात्मक आजार बरे करण्याचा छंद आहे.
सर्वाधिक धोकादायक आणि अती वेदनादायी आजार म्हणून “कॅन्सर” तथा
“कर्करोग” कडे पाहिले जाते. हा आजार झाला आहे, असे
समजल्यावर अर्धे आयुष्य गमावल्याची भावना रुग्णाची होते. हा आजार आहे सुद्धा तसा.
खुप वेदनादायी आणि माणसाचे जीवन हादरवून टाकणारा.